आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अख्खं गाव स्वखर्चाने करतय घरोघर प्रचार 

Punediamondnews

शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर

 वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा आमदाराने उद्ध्वस्त केली.आमदार पदाचा गैरवापर करून अनेक प्रकारे छळवाद मांडला, वाबळेवाडी करांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला आणि मग झाला त्यांच्या क्रोधाचा विस्फोट आमदाराला वाबळेवाडीने जाहीर गावबंदी केली. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत वाबळेवाडीचे सगळे ग्रामस्थ, महिला, पालक व माजी विद्यार्थी स्वतःच्या गाड्या स्वतःचे जेवणाचे डबे घेऊन शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या राक्षसाला संपवण्यासाठी बाहेर पडले असल्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी ग्रामस्थांनी विद्यमान आमदारांना विरोध करण्यासाठी बाहेर पडणे हे एकमेव उदाहरण आहे.

वाबळेवाडी कर शिरूर हवेलीत गावोगाव घरोघर फिरत आहेत. शाळेच्या यशाची गाथा आणि अन्यायाची व्यथा सर्वांपुढे मांडत आहेत.एकूणच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक उन्नतीसाठी अडथळा असणाऱ्या या खुनशी आमदाराला निवडणुकीच्या निमित्ताने संपवून टाकण्याचे भावनिक आवाहन जनसामान्यांना करत आहेत. यामुळे विद्यमान आमदार पवार यांच्याबाबत करण्यात येणाऱ्या आवाहनाला ग्रामस्थ मनोमन प्रतिसाद देत असून बापूच हे चुकलच अस म्हणत असून शाळेत राजकारण नको व्हायला पाहिजे असे बोलत असून याचा परिणाम मतदारांच्या मनावर होत असून वाबळेवाडी करांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

एका गावाने आमदाराच्या विरोधात प्रचारासाठी घरचे डबे घेऊन स्वखर्चाने गावोगाव प्रचार करणे त्यात शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील आमदाराच्या विरोधात हे अत्यंत वेदनादायी असून यामागील ग्रामस्थांची एकजूट ,शिक्षणाविषयी आत्मीयता, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी जागृत पालक व ग्रामस्थ यांची जिद्द दिसत असून आमदार पवार यांना वाबळेवाडी प्रकरण चांगलेच त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
www.punediamondnews.com