वाबळेवाडी ग्रामस्थांकडून ढमढेरे-भुजबळांच्या विरोधात व्यंकटेशचा शेअर्सबॉंब
व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांच्या पावत्या दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी आमदार अशोक पवारांच्या आडून जो जाहीर प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर त्यांना शासनाच्या चौकशी समितीने कधीच दिले आहे. आता ढमढेरे यांनीच पुढे यावे आणि व्यंकटेश…
आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अख्खं गाव स्वखर्चाने करतय घरोघर प्रचार
शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा आमदाराने उद्ध्वस्त केली.आमदार पदाचा गैरवापर करून अनेक प्रकारे छळवाद मांडला, वाबळेवाडी करांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला आणि मग झाला त्यांच्या क्रोधाचा विस्फोट आमदाराला वाबळेवाडीने जाहीर गावबंदी केली. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत वाबळेवाडीचे सगळे ग्रामस्थ, महिला, पालक व…
महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई खामकरांचे आमरण उपोषण
टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध अपंग) यास अनुदान मिळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्षा जाई खामकर २६ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जय खामकर यांनी सांगितले की, हे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांगांसाठी उच्च शिक्षण…
माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी
“दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार” – कु. सार्थक माणिक सातव कोरेगाव भिमा – वाघोली (ता. हवेली) येथे स्वर्गीय माणिकराव दादा सातव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कुमार सार्थक माणिकराव सातव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरास २५ ते ३० हजार नागरिकांनी भेट दिली…
मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी
पुणे – जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १७ ऑगस्ट २०२४) रात्री दहा वाजेच्या सुमारास ॲड. गणेश म्हस्के घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने…
पुणे, नगर रोडवर जंबो फ्लाय ओव्हर उभारून ट्रॅफिक मुक्त करणार – अजित पवार
सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणसवाडी येथील जन सन्मान यात्रेत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सणसवाडी येथे जन सन्मान यात्रेची तयारी उत्साहात…
सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून पुणे जिल्ह्यासह शिरूर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह घटक पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व दादा पाटील फराटे यांनी…
जे जे इंटरनेशनल स्कूल च्या निल मैड ची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
करंदी (ता. शिरूर) येथील जे जे इंटरनेशनल स्कूलचा विध्यार्थी निल प्रशांत मैड याची चौदा वर्षीय राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण संघामधुन निवड झाली आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ऑगस्ट रोजी अंथरणे ता. इंदापूर येथे टेनिस क्रिकेट जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या…
पिंपळे जगताप ग्रामस्थांचे रस्त्यांसाठी साखळी उपोषण सुरू
पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसत आहे. जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम…
- 1
- 2