पुणे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत कोरेगाव भिमाचा शिवंश मोटे जिल्ह्यात प्रथम

Punediamondnews

कोरेगाव भिमा ( ता. शिरूर) येथील पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेतील  इयत्ता पहीलितील विद्यार्थी शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने शिवबाची शिकवण हे नाटक जिल्हा स्तरावर सादर करत ग्रामीण विभागात गट क्रमांक १ मध्ये प्रथक क्रमांकाचे बक्षीस व पदक मिळवल्याने त्याचे व कुटुंबीय व मार्गदर्शकांचे कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

बालरंग भूमी पुणे जिल्हा व निळू फुले अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख नाट्यछटा स्पर्धा २०२४  या नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव पुनर्वसनचा इयत्ता पहिलीचा विद्यार्थी शिवंश अतुल मोटे याने जिल्हास्तरावर  प्रथम क्रमांक मिळवला यावेळी अभिनेत्री ऋजुता देशमुख, नीलम शिर्के, विजय कोलते, अरुण पटवर्धन या  अभिनेत्यांकडून सन्मान चिन्ह देऊन शिवंश मोटे याला सन्मानित करण्यात येऊन त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

     स्पर्धेसाठी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्याने त्याची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली होती .या स्पर्धेसाठी त्युला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार सर, वर्ग शिक्षिका पराड मॅडम, मेघा कुलकर्णी मॅडम, शिंदे सर ,मिडगुले सर ,गव्हाणे सर ,जकाते सर, नागरे सर, भुजबळ मॅडम,रासकर सर यांनी मोलाचे मार्गगर्धन केले. 

  कोरेगाव भिमा येथील शिवंश अतुल मोटे याने नाट्य स्पर्धेत जिल्हास्तरावर ग्रामीण विभागात गट क्रमांक एक मध्ये जिल्हा स्तरावर पदक मिळवले याबद्दल कोरेगाव भीमाचे सरपंच संदिप ढेरंगे यांनी अभिनंदन करत त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
www.punediamondnews.com