रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ, पिंपळे जगताप ग्रामस्थांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा

Punediamondnews

पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून. कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत उपोषण  करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासनाला दिला आहे.

जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम विभाग यांना पत्र लिहून येत्या १२ ऑगस्टला ग्रामस्थ मिळून उपोषण आंदोलन करणार असल्याचे कळविले असून चाकण – शिक्रापूर रोड (करंदी फाटा ) ते सणसवाडीकडे जाणारा रस्ता विशेषतः ‘भारत गॅस’  कंपनीकडे जाणारा अंदाजे २ किमी अंतर रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रामुख्याने २५ मे. टन वजन क्षमतेपेक्षा जास्त वजनाची अवजड वाहने भारत गॅस कारखान्याची वाहतूक होत आहे. त्याचबरोबर कामगार, शेतकरी, शाळकरी मुले, व्यावसायिक या रस्त्यावरून ये- जा करत आहे, परंतु हा रस्ता वापरण्यायोग्य राहिलेला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

रस्त्यावर खड्यांचं साम्राज्य पसरले आसल्याने मोठमोठे ट्रक चालक देखील वाहतूक करताना जीव मुठीत धरून वाहतूक करत आहेत. याबाबत यापूर्वी देखील ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक विभागाला ग्रामस्थांनी माहिती कळवली होती परंतु अद्याप काहीच ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

त्याचप्रमाणे  चाकण – शिक्रापूर रस्ता (करंदी फाटा) ते एल अँड टी फाटा (पुणे – अहमदनगर रस्ता) हा रस्ता देखील अल्पावधीतच खराब झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील चर्चेचा विषय ठरली आहे. हा रस्ता शिक्रापूर येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला दिलासा देणारा रस्ता आहे. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या इशाऱ्याची कशा प्रकारे दखल घेणार हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
www.punediamondnews.com