सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून पुणे जिल्ह्यासह शिरूर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह घटक पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व दादा पाटील फराटे यांनी दिली.
‘ सन्मान जनतेचा,मार्ग लोककल्याणाचा ‘ हा विचार मंत्र घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा शिरूर तालुक्यात सणसवाडी येथील कृष्णलीला गार्डन येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार असून त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचित असून ते उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर, सुधीर फराटे, शशिकांत दसगुडे, नवनाथ हरगुडे , कुंडलिक शितोळे, संतोष दौंडकर, राजेंद्र गव्हाणे, अमित गव्हाणे, व इतर मान्यवर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार यांची सभा विधानसभेसाठी लक्षवेधी – राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात आता राजकीय आखाडा रंगणार असून विधान सभेची जागा व उमेदवारी गुलदस्त्यात असून दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा व कामाचा झपाटा यामुळे सर्वांनाच अजित पवार यांचे आकर्षण असून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही सभा मात्र लक्षवेधी व शिरूर हवेली विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील राजकीय आखाड्याची रंगीत तालीम ठरणार की काय ?? याची उत्सुकता दिसून येत आहे.