करंदी (ता. शिरूर) येथील जे जे इंटरनेशनल स्कूलचा विध्यार्थी निल प्रशांत मैड याची चौदा वर्षीय राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण संघामधुन निवड झाली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ऑगस्ट रोजी अंथरणे ता. इंदापूर येथे टेनिस क्रिकेट जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या मध्ये ऑलराउंडर खेळाडू म्हणून निल याची निवड करण्यात आली.
२३ ते २५ ऑगस्ट रोजी बारामती इथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण संघाची निवड करण्यात येणार होती.त्याच्या निवडी बद्दल शाळेचे संस्थापक व बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर व्यवस्थापक प्रा. सुनीता फुके प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर प्रशिक्षक चेतन झाडकर प्रा. लता शिंदे यांनी त्याचे अभिनंदन केले.