सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणसवाडी येथील जन सन्मान यात्रेत शिरूर करांना आश्र्वासित केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित जन सन्मान यात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांच्या प्रस्तवनेनंतर थेट भाषणाला उभे राहिलेल्या अजित पवार यांनी सर्व स्तरातील वैयक्तीक लाभाच्या योजनांचा आढावा घेत सांगितले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पुढील महायुतीच्या सरकारच्या काळात चालू राहणार असून विरोधक जी टीका करतात ती निराधार आहे कारण मी आत्तापर्यंत १० वेळा अर्थसंकल्प मांडला असून चालू अर्थसंकल्प हा ६५ लाख कोटींचा असून ४२ लाख कोटींपेक्षा जास्त महाराष्ट्राचे स्थूल उत्पन्न हे राज्याची आर्थिक सुस्थिती दर्शविते त्यामुळे विरोधकांनी आता राज्याची आणि आम्ही जाहीर करत असलेल्या लोक कल्याणकारी योजनांची काळजी करू नये.
मी १९९१ शिरूरचा लोकसभेचा खासदार होतो त्यामुळे शिरूर हवेली आणि या भागातल्या सामाजिक, प्रशासकीय, संस्थात्मक विकास कामांमध्ये माझे सर्वाधिक योगदान आहे.स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराज यांचे स्मारक ३०० कोटी एव्हढ्या विक्रमी निधीमध्ये आपण उभे करत असून शिरूर हवेली करांची सर्वात मोठी डोके दुखी असलेली पुणे नगर रोडची वाहतूक कोंडी आपण पुणे नगर रोडवर जंबो फ्लाय ओव्हर उभारून आपण शिरूर वाघोलिकरांना ट्रॅफिक मुक्त करणार म्हणजे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा महिलाध्यक्ष मोनिका हरगुडे,आरती भुजबळ,माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, संचालक दादा पाटील फराटे,बाबासाहेब फराटे, राजेंद्र जगदाळे, शशिकांत दसगुडे, सुधीर फराटे, संचालक स्वप्नील ढमढेरे, माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, चंदन सोंडेकर, शांताराम कटके, राजाराम गव्हाणे,राजेंद्र कोरेकर, शरद तालेवार,शिवाजी दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तर मग व्यंकटेश का बंद केला नाही ? घोडगंगा कारखाना माझ्यामुळे बंद झाल्याची चकाटी शिरूर मध्ये उठवली जात आहे.मी कारखाना सुरू करण्यासाठी नुकतेच ३५ कोटी दिले तरीही मी कारखाना बंद पाडत असेल तर व्यंकटेश साखर कारखाना का बंद पाडला नाही. असे म्हणत श्री पवार यांनी आमदार अशोक पवार यांचा नामोल्लेख टाळत आमदार अशोक पवार यांना कोपरखळी मारली व अनुभव नसलेल्या मुलाला चेअरमन केल्यामुळे ही अवस्था झाल्याची खंत बोलून दाखवली.
व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील…
शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा…
टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध…
"दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार" - कु. सार्थक माणिक सातव…
पुणे - जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची…
सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण…