पिंपळे जगताप ग्रामस्थांचे रस्त्यांसाठी साखळी उपोषण सुरू

पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसत आहे.

    जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम विभाग यांना पत्र लिहून येत्या १२ ऑगस्टला ग्रामस्थ मिळून उपोषण आंदोलन करणार असल्याचे कळविले होते. चाकण – शिक्रापूर रोड (करंदी फाटा ) ते सणसवाडीकडे जाणारा रस्ता विशेषतः ‘भारत गॅस’  कंपनीकडे जाणारा अंदाजे २ किमी अंतर रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रामुख्याने २५ मे. टन वजन क्षमतेपेक्षा जास्त वजनाची अवजड वाहने भारत गॅस कारखान्याची वाहतूक होत आहे. त्याचबरोबर कामगार, शेतकरी, शाळकरी मुले, व्यावसायिक या रस्त्यावरून ये- जा करत आहे, परंतु हा रस्ता वापरण्यायोग्य राहिलेला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर उपोषण सुरू केले असून आता तरी प्रशासनाला जाग येईल काय ? आमच्या जीवाशी होणारा खेळ थांबणार की आमच्या जिविताच सरकारला काहीच देणं घेणं नाही का ? असा प्रश्न विचारत ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत.

रस्त्यावर खड्यांचं साम्राज्य पसरले आसल्याने मोठमोठे ट्रक चालक देखील वाहतूक करताना जीव मुठीत धरून वाहतूक करत आहेत. याबाबत यापूर्वी देखील ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक विभागाला ग्रामस्थांनी माहिती कळवली होती परंतु अद्याप काहीच ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने ग्रामस्थांनी अखेर आंदोलन सुरू केले आहे.

त्याचप्रमाणे  चाकण – शिक्रापूर रस्ता (करंदी फाटा) ते एल अँड टी फाटा (पुणे – अहमदनगर रस्ता) हा रस्ता देखील अल्पावधीतच खराब झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील चर्चेचा विषय ठरली आहे. हा रस्ता शिक्रापूर येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला दिलासा देणारा रस्ता आहे. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या उपोषणाची शासनाने तातडीने दखल घेत नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबण्यासाठी काय प्रयत्न करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी  श्रीपाद जगताप, अरुण जगताप, शामराव बेंडभर, सुभाष जगताप,  संदीप  जगताप, अशोक नाईकनवरे, चंदन सोंडेकर , अण्णा कुसेकर, शरद  जगताप , सागर कुसेकर, पंडित थिटे, अण्णा दौंडकर , दीपक बेंडभर ,  योगेश थिटे , कैलास बेंडभर, महेश जगताप , राजू तांबे, अशोक वाडेकर, दिलीप जगताप, स्वप्निल शेळके, सुधीर भोसले, निलेश फडतरे ,  दत्तात्रय तांबे, भाऊसाहेब बेंडभर , मोहन भुजबळ , भरत जगताप , रवी जगताप , विश्वास जगताप, आबा तांबे , रमेश दौंडकर , सोनू शितोळे ,  आदित्य जगताप ,  प्रसाद जगताप , व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

        पिंपळे जगतापच्या सरपंच सोनल नाईकनवरे,उपसरपंच अनिता दौंडकर, माजी उपसरपंच रेश्मा कुसेकर, पोलीस पाटील वर्षा थिटेग्रामसेवक रवींद्र शिंदे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने तूर्तास डागडुजी करू असे आश्वासन देऊन उपोषण स्थगीत करण्याची विनंती केली.

punediamondnews@gmail.com

Recent Posts

वाबळेवाडी ग्रामस्थांकडून ढमढेरे-भुजबळांच्या विरोधात व्यंकटेशचा शेअर्सबॉंब

व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील…

1 month ago

आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अख्खं गाव स्वखर्चाने करतय घरोघर प्रचार

शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर  वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा…

1 month ago

महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई  खामकरांचे आमरण उपोषण

टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध…

3 months ago

माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी

"दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार" - कु. सार्थक माणिक सातव…

4 months ago

मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी

पुणे - जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची…

4 months ago

पुणे, नगर रोडवर जंबो फ्लाय ओव्हर उभारून ट्रॅफिक मुक्त करणार – अजित पवार

सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक…

4 months ago