पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून. कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासनाला दिला आहे.
जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम विभाग यांना पत्र लिहून येत्या १२ ऑगस्टला ग्रामस्थ मिळून उपोषण आंदोलन करणार असल्याचे कळविले असून चाकण – शिक्रापूर रोड (करंदी फाटा ) ते सणसवाडीकडे जाणारा रस्ता विशेषतः ‘भारत गॅस’ कंपनीकडे जाणारा अंदाजे २ किमी अंतर रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रामुख्याने २५ मे. टन वजन क्षमतेपेक्षा जास्त वजनाची अवजड वाहने भारत गॅस कारखान्याची वाहतूक होत आहे. त्याचबरोबर कामगार, शेतकरी, शाळकरी मुले, व्यावसायिक या रस्त्यावरून ये- जा करत आहे, परंतु हा रस्ता वापरण्यायोग्य राहिलेला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
रस्त्यावर खड्यांचं साम्राज्य पसरले आसल्याने मोठमोठे ट्रक चालक देखील वाहतूक करताना जीव मुठीत धरून वाहतूक करत आहेत. याबाबत यापूर्वी देखील ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक विभागाला ग्रामस्थांनी माहिती कळवली होती परंतु अद्याप काहीच ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
त्याचप्रमाणे चाकण – शिक्रापूर रस्ता (करंदी फाटा) ते एल अँड टी फाटा (पुणे – अहमदनगर रस्ता) हा रस्ता देखील अल्पावधीतच खराब झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील चर्चेचा विषय ठरली आहे. हा रस्ता शिक्रापूर येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला दिलासा देणारा रस्ता आहे. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या इशाऱ्याची कशा प्रकारे दखल घेणार हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.
व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील…
शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा…
टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध…
"दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार" - कु. सार्थक माणिक सातव…
पुणे - जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची…
सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक…