पुणे – जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १७ ऑगस्ट २०२४) रात्री दहा वाजेच्या सुमारास ॲड. गणेश म्हस्के घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन केला. फोनवर जरांगे पाटलांची लय बाजू घेतो का, तुला जास्त मस्ती आली का असे म्हणून तुझे तुकडे तुकडे करून खंडोबाच्या मंदिरामागे कुत्र्याला खायला फेकून देईल अशी धमकी दिली. ॲड. म्हस्के यांना आलेल्या धमकीमुळे एकाच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अज्ञाताविरोधात पुणे शहर लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोपर्डी येथील चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या संघटनेच्या चौघांनी कोपर्डी प्रकरणातील चीमुकालीची हत्या करणाऱ्या आरोपींवर अहमदनगर न्यायालयात हल्ला केला होता. कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या चौघांची ॲड. गणेश म्हस्के यांनी न्यायालयात नि:शुल्क बाजू मंडळी होती.
ॲड. म्हस्के यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहिले तसेच ॲड. म्हस्के यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. मराठा आरक्षण चळवळीत जरांगे पाटील यांना म्हस्के यांची साथ लाभली आहे. जरांगे पाटलांवर आरोप झाले तेव्हा ॲड. म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेवून आरोपांचे खंडन केले होते व जरांगे पाटलांची सत्य बाजू समोर मांडली होती. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी ॲड. म्हस्के यांना आलेल्या धमकीच्या फोनमुळे एकच खळबळ उडाली असून मराठा समाज बांधवांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना धमकी देमाऱ्यावर काडक कारवाई करण्यात यावी अन्यथा सकाळ मराठा समाज हे खावून घेणार नाही. – संदिप कांबिलकर, समन्वयक, सकल मराठा समाज
असल्या धमक्यांना भित नाही.जोपर्यंत जिवातजीव आहे तोपर्यंत समाजासाठी लढतच राहणार आहे. धमकी देणाऱ्याने हिंमत असेल तर समोर येऊन दाखवावे. – ॲड.गणेश म्हस्के
व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील…
शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा…
टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध…
"दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार" - कु. सार्थक माणिक सातव…
सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक…
सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण…