शिरुर-हवेली मतदार संघातून अजित पवारांची उमेदवारी ?  ’पक्का खबरी’ची खात्रिलायक माहिती

शिरुर  – शिरुर हवेली मतदार संघातून महाआघाडीचा उमेदवार कोण याचे उत्तर येत्या काही दिवसात मतदार संघाला मिळणार असून ही ब्रेकींग बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच देणार आहेत. शिरुर व हवेलीतील राष्ट्रवादीचे काही प्रमुख कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच भेटून आले असून त्यांनी स्वत: अजितदादांनाच उमेदवारीची गळ घातली आहे. अर्थात अगदी मनातलं बोललात म्हणत दादांनी आपल्या उमेदवारीला तत्वत: होकार देवून त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना बारामतीतून उभे करण्याचाही मनोदय व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडी बंद खोलीत झाल्या असल्या तरी शिरुरचा पक्का खबरीने ही माहिती आपल्या हुशारीने मिळवून शिरुर हवेलीसाठी आज जाहीर केली. 

          शिरुर हवेली तालुक्यातील तमाम मतदारांसाठी एक खुषखबर. राज्यातील एक तगडा नेता शिरुर हवेली मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर करण्याच्या मनस्थितीत असून लवकरच ही घोषणा ते करतील. यासाठी शिरुर तालुक्यातील काही प्रमुख नेते पुढा-यांनी खास भेट घेवून त्यांच्या उमेदवारीची मागणी केली असून त्यांनी तत्वत: मान्यताही दिल्याची माहिती आहे. अर्थात हा नेता म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच असणार असून त्यांच्या मुलासाठी म्हणजेच पार्थला ते बारामतीतून आमदार करण्याच्या तयारीत असल्याचेही विश्वासनिय सूत्रांनी सांगितले. याबाबत शिरुर मधील १० पदाधिका-यांचे व दोन महिला पदाधिका-यांचे एक शिष्ठमंडळ अजितदादा पवार यांना मुंबईत भेटून आले. यावेळी शिरुर हवेलीतील महाआघाडीच्या उमेदवारीबद्दल खुलाशाने चर्चा झाली. 

         राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार अ‍ॅड.अशोक पवार हेच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने शिरुर-हवेलीतून आता महाआघाडीची उमेदवारी कुणाला याबद्द्ल तर्कवितर्क लढविले जात आहे. अशातच अजित पवार यांच्या उमेदवारीने शिरुर हवेली मतदार संघ मात्र चांगलाच चर्चेत आला आहे. यावरच शिरुर हवेली मतदार संघावर लक्ष ठेवून असलेला पक्का खबरी ने काही वरील बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांकडून माहिती एकत्रित करुन शिरुर हवेलीतील सर्व मतदारांसाठी वरील खबर जाहीर केली आहे. 

मतदारसंघ भाजपला नाही राष्ट्रवादीलाच 
 शिरुर – हवेली मतदार संघ हा महायुतीतील कुणासाठी राखिव ठेवला जाणार याबद्दल उलट सुलट बोलले जात असले तरी एकुणच राज्याचे आणि पुणे जिल्हाचे राजकारण पाहता शिरुर हवेली हा राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचे कारण असे की, या मतदार संघाची चाचपणी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीकडूनच सुरू आहे. भाजपाचे सर्वात प्रबळ इच्छुक असलेले प्रदीप कंद हे आपल्या निवडणूकपूर्व प्रचारासाठी कुठेही सक्रीय दिसत नसून त्यांना खुद्द अजित पवारांनीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एका मासिक बैठकीवेळी यावेळी थांबण्याचे सांगितल्या पासून कंदांनी आपला प्रचार आवरता आणि आटोपता घेतल्याची विश्वासनिय चर्चा आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीत बारामतीतून सुनेत्रा पवारांना बसलेल्या फटक्यामुळे अजित पवारही बारामतीतून उभे राहणार नसल्याने तिथे पार्थला संधी देवून स्वत: मात्र शिरुर हवेलीतून उभे राहून पुणे जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी ते सरसावलेले आहेत.

punediamondnews@gmail.com

Recent Posts

वाबळेवाडी ग्रामस्थांकडून ढमढेरे-भुजबळांच्या विरोधात व्यंकटेशचा शेअर्सबॉंब

व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील…

1 month ago

आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अख्खं गाव स्वखर्चाने करतय घरोघर प्रचार

शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर  वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा…

1 month ago

महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई  खामकरांचे आमरण उपोषण

टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध…

3 months ago

माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी

"दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार" - कु. सार्थक माणिक सातव…

4 months ago

मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी

पुणे - जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची…

4 months ago

पुणे, नगर रोडवर जंबो फ्लाय ओव्हर उभारून ट्रॅफिक मुक्त करणार – अजित पवार

सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक…

4 months ago