पाबळ- केंदूर गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ प्रचारात आघाडीवर मोठ्या प्रमाणावर कामे केल्याने मतदार देणार मोठे मताधिक्य -प्रकाश पवार
पाबळ : केंदूर पाबळ गटात थिटेवाडी बंधाऱ्यासह केंदूर वढू बुद्रुक पाबळ तीर्थस्थळ दर्जा, ग्रामिण रुग्णालय, ५३७ कोटींचा छत्रपती संभाजी महाराज विकास आराखडा, पाबळ सबस्टेशन ,आरोग्य केंद्र, बेल्हे- जेजुरी रस्ता त्याच बरोबर गावागावात कॉंक्रिट रस्ते , सबस्टेशन अशी कामे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता दिल्याने झाली आहेत. यावेळी प्रफुल्ल शिवले ,वंदना पवार ,सुचेता थिटे यांच्यासाठी मताधिक्याचा विक्रम करा. राष्ट्रवादीकडून या गटाला जिल्हा तालुका पातळीवर चांगली संधी देईल अशी ग्वाही शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी पाबळ ता. शिरूर येथे दिली.
पाबळ येथे पाबळ केंदूर गटाचे उमेदवार प्रफुल्ल शिवले यांच्यासह प्रकाश पवार यांनी बैठक घेतल्या. यावेळी बोलताना प्रकाश पवार यांनी सांगितले की, वरील कामे ही केवळ राष्ट्रवादीच्या प्रगती धोरणाचा भाग आहे. या गटाची प्रगतीची गती आणखी वाढवायची असेल तर धार्मिक आणि वास्तविक विचार करणारे नेतृत्व म्हणून प्रफुल्ल शिवले यांना विक्रमी मतांनी जिल्हा परिषदेत पाठवायला पाहिजे.
या भागातील १२ गावांना ठोस पाणीस्त्रोत मिळविण्यासाठीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
बैठका आपण स्वतः पुढाकार घेऊन मुंबई आणि नागपूर येथे लावल्या आहेत. हा प्रश्न कायमचा कायम सोडवायचा असल्याने याबाबत जोमाचे प्रयत्न सुरू असून, प्रफुल्ल शिवले यांनीही ही बाब वरिष्ठ पक्षपातळीवर नेली असल्याचे प्रकाश पवार यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी आपल्या भूमिका मांडल्यावर जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याची ग्वाही दिली. दरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासात निवडणुकीपूर्वीच २१ हजार भाविकांना थेट उजैन यात्रा घडविली, तो पुण्याचा भाग होता. मात्र, येत्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्राचे आत्याधुनिकीकरण करुन मोबाईल व्हॅनद्वारे सोनोग्राफी, रक्त-शुगर-लघवी तपासणी सुविधा पाबळ केंदूर गटात सुरू करायची आहे. त्यामुळे शिक्षणासाठी आदर्श पाबळ केंदूर गट आरोग्य सुविधेसाठीही जिल्ह्यात लक्षवेधी आपण करणार आहे,” असे आश्वासन पाबळ – केंदूर गटातील जिल्हा परिषदेसाठीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल शिवले यांनी मुखई (ता. शिरूर) येथे दिले.
यावेळी बोलताना प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या वतीने केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याअंतर्गत मुखई, धामारी, हिवरे, पिंपळे जगताप, पाबळ आणि करंदी येथील उपकेंद्रात प्राथमिक उपचार,सर्प-श्वानदंश प्रतिबंधक लसीकरण आणि बाळंतपणेही होतात. गटातील सर्वांना दर्जेदार व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी या केंद्रांमध्ये सोनोग्राफी व तत्सम सुविधा नसल्याने सोनोग्राफी, रक्त-शुगर-लघवी तपासणी अशा सेवा मोबाईल व्हॅनद्वारे देण्याची आपली योजना आहे. पाबळ-केंदूर गटात जिल्हा परिषदेसाठी प्रफुल्ल शिवले यांना उमेदवारी देण्याची मोठी मागणी होती, त्याप्रमाणे त्यांना उमेदवारी दिली. सद्यस्थितीत त्यांना व पाबळ व केंदूर गणात राष्ट्रवादीसाठी मिळणारा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादीच्या तिनही उमेदवारांच्या मताधिक्याचा उच्चांक होईल असे चित्र दिसते.”प्रफुल्ल शिवले यांच्या रुपाने या भागाची आरोग्याची काळजी घेणारा श्रावणबाळ उमेदवार मिळाला,” असे माजी सरपंच अतुल धुमाळ यांनी यावेळी सांगितले.