गोंदियाच्या फुलचुर येथील शेकडो सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. अत्यंत विषारी नाग चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुनील नागपुरे (वय ४४) असं सर्प मित्राचं नाव आहे. काल रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना मिळाली. नागाला रेस्क्यू करण्यासाठी त्यांनी लगेचच या ठिकाणी धाव घेतली. जवळ असलेली स्नेक स्टिक घेऊन ते तेथे पोहचले.(SnakebiteTragedy)
त्यानंतर त्यांनी आपल्या स्नेक स्टिकने सापाला कपडलं. त्यांनी पकडलेला साप अत्यंत विषारी किंग कोब्रा होता. त्यामुळे त्याला रेस्क्यू करताना सुनील यांनी पूर्ण काळजी घेतली होती. त्यांनी कोब्रा पकडला आणि जवळ असलेल्या गोणीमध्ये भरला. साप गोणीत जात असताना तो अचानक उलट फिरला आणि त्याने लगेचच सुनील यांच्या हाताचा चावा घेतला.(NatureConservation)
नागाने त्यांना दंश केल्याचं तेथे उपस्थित अन्य सर्व व्यक्तींनी पाहिलं होतं. मात्र दंश केल्यानंतर देखील सुनील लगेचच मागे हटले नाहीत. त्यांनी सापाला आपल्या हातांनी पकडलं आणि पुन्हा गोणीमध्ये ठेवलं. नाग पुन्हा गोणीत भरत असताना चक्कर येऊन त्यांचा तोल जात होता.(SnakeHandler)
गोणी बांधल्यानंतर सुनील यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. सापांना जीवदान देणाऱ्यालाच सापाने दंश केला त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनील यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबियांनी रडून आक्रोश व्यक्त केला आहे. (UnsungHero)