दुष्काळात मदतीचा हात देणाऱ्या पवारांच्या पाठीशी पाबळसह सर्वच गावे खंबीरपणे उभे -पाबळ गणात सौ वंदना काकी पवार व प्रफुल्ल शिवले यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा
धामारी :पाबळ पंचक्रोशीत जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा भीषण दुष्काळाचे सावट आले, तेव्हा मदतीला धावून येणारे नाव म्हणजे ‘पवार कुटुंब’. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाबळमधील वाड्या-वस्त्या आणि गावठाण परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी पवार कुटुंबाने स्वखर्चाने टँकरची व्यवस्था करून नेहमीच माणुसकीचा आधार दिला आहे. याच उपकारातून उतराई होण्याची भावना व्यक्त करत, आगामी पंचायत समिती निवडणुकीत प्रकाश बापू पवार यांच्या पत्नी सौ. वंदना काकी पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. पक्षाच्या माध्यमातून भरीव निधी आणत पाबळ ,धामारी ,जातेगाव ,मुखई ,हिवरे , खैरेनगर ,येथील अनेक वाड्या वस्त्यावर व प्रत्यक गावात गेल्या काही वर्षांत सिमेंट कॉंक्रिटचे रस्त्यांची कामे अनेक भागात पूर्ण झाली आहॆ. पाबळ गावठाणात व वाड्या वरील संपूर्ण रस्ते कॉंक्रिटचे झाले आहेत. तर वळसेपाटील यांच्या माध्यमातून येथील वीजउपकेंद्र या भागाला वरदान ठरले आहॆ. त्याच बरोबर भव्य आरोग्य उपकेंद्र व या भागातील थिटेवाडी बंधारा या भागाला वरदान ठरला असून येत्या काळात पक्षाच्या माध्यमातून राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वंदना काकी प्रकाश पवार यांनी सांगितले.
संकटकाळात शासकीय मदतीची वाट न पाहता माजी सभापती प्रकाश बापू पवार आणि श्री. सदाशिव पवार यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केले आहे. पवार कुटुंब गेले अनेक वर्ष या भागातील प्रत्येक नागरिकांच्या सुखात व दुःखात सहभाग झाले आहेत त्याचीच जाणीव ठेवत सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली असून “आमच्या अडीअडचणीत जो धावून येतो, तोच आमचा खरा लोकप्रतिनिधी,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी पवारांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रकाश बापूंच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा पाहता, त्यांच्या पत्नीला संधी देणे म्हणजे पाबळ व परिसरातील गावांच्या विकासाला गती देणे होय, असा सूर यावेळी उमटत आहॆ.
यावेळी बोलताना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आठवणींना उजाळा दिला. “जेव्हा गावावर दुष्काळाचे सावट होते, तेव्हा प्रकाश बापूंनी स्वतः फिरून टँकरचे नियोजन केले. आज तीच वेळ आमच्यावर आली आहे की, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. ही निवडणूक केवळ एका पदाची नसून, ती विश्वासाची आणि कृतज्ञतेची आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
सौ. वंदना काकी पवार यांना मिळणारा हा वाढता पाठिंबा पाहता, या पंचायत समिती गणामध्ये त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. महिला वर्गाचा मोठा सहभाग आणि तरुणांचा उत्साह यामुळे ‘पवार कुटुंबाचा’ हा बालेकिल्ला अधिक मजबूत होताना दिसत आहे.